कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:35+5:302021-05-31T04:15:35+5:30
पहिला डोस वेगळा अन् दुसरा डोस वेगळा... जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाखांच्या आसपास नागरिकांनी लस घेतली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ...

कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?
पहिला डोस वेगळा अन् दुसरा डोस वेगळा...
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाखांच्या आसपास नागरिकांनी लस घेतली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस याच लसीचा ८४ दिवसांनी घेतला जात आहे. तर कोव्हॅक्सिनचा एक महिन्यानंतर दुसरा डोस घेतला जात आहे. जिल्ह्यात अनावधानाने पहिला डोस एक अन् दुसरा डोस दुसऱ्या लसीचा अशा एक-दोन घटना घडल्याची उदाहरणे आहेत. मात्र, त्यांना दुसरा डोस ज्या लसीचा घेतला होता त्यानंतर त्याच लसीचा डोस घेण्याबाबतचा सल्ला दिला आहे.
तज्ज्ञ डॉक्टर्स म्हणतात, धोका नाही...
पहिल्या डोस एकाचा आणि दुसरा डोस दुसऱ्याच लसीचा घेतला तर धोका नाही. परंतु, पूर्ण फायदा होण्यासाठी एकाच लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. नजरचुकीने अशी घटना घडली असेल तर दुसरा डोस ज्या लसीचा घेतला होता त्याच लसीचा निर्धारित कालावधी संपल्यानंतर डोस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फायदा होईल.
डॉ. मारुती कराळे, लातूर.
कोरोनाविरोधात या लसी आहेत; परंतु, दोन्हीही डोस एकाच लसीचे घ्यावेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसी आहेत. शासनाच्या सूचनांचे अनुपालन करून लस दिली जात आहे. त्यामुळे कॉकटेल होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जर झाला तर नुकसान नाही. परंतु, दुसरा डोस एकाच लसीचा व्हावा.
- डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक.
दुष्परिणाम अथवा धोका नाही. आपल्या जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे. पूर्ण फायदा होण्यासाठी संबंधिताला दुसऱ्या डोसच्या वेळेस जी लस घेतली होती ती परत घेण्यास सांगितले आहे.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.