शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल बिघडला म्हणून काय झाले, आराेग्य बिघडायला नकाे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदी आणि निर्बंधामुळे घरातच काेंडून असलेल्या नागरिकांचा माेबाईलचा वापर वाढला आहे़ ...

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदी आणि निर्बंधामुळे घरातच काेंडून असलेल्या नागरिकांचा माेबाईलचा वापर वाढला आहे़ परिणामी, माेबाईलमध्ये तांत्रिक बिघाड हाेण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे़ आता निर्बंध शिथिल झाल्याने ग्राहकांची माेबाईल दुुरुस्तीसाठी माेबाईल शाॅपीवर गर्दी हाेत आहे़ तर माेबाईलविना आता नागरिकांनाही करमत नसल्याचे समाेर आले आहे़ महाराष्ट्रात सरकारने १४ एप्रिलपासून कडक निर्बंध जाहीर केले हाेते़ त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्याच कामाला घराबाहेर पडता येत हाेते़ यातून बहुतांश नागरिक घरीच हाेते़ घरात राहिल्याने वेळ घालविण्यासाठी अबालवृद्धांसह सर्वांचा माेबाईल हाच एकमेव आधार हाेता़ वर्क फ्राॅम हाेम, ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन क्लासेस, नेट बँकिंग यासाेबतच काेराेना रुग्णांची चाैकशी करण्यासाठी, नातेवाईकांना बाेलण्यासाठी व्हिडिओ काॅलिंगसाठी माेबाईलचा माेठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे़ यासाेबतच लसीकरण नाेंदणीसाठी सर्वांनाच माेबाईलचा वापर करावा लागत आहे़ सततच्या वापरासह इतर कारणामुळे माेबाईलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे़ मात्र, कडक निर्बंधामुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली हाेती़ याशिवाय, इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती़ त्यासाेबतच ऑनलाईन माेबाईलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले हाेते़ परिणामी, अनेकांना आपला माेबाईल दुरुस्ती करता आला नाही़ आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत़ अनलाॅक झाल्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत़ माेबाईलच्या दुकानात माेबाईल दुरुस्तीसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत़

काय कारण

सततच्या वापराने माेबाईलमध्ये बिघाड झाला़ माेबाईल स्क्रीन गार्ड खराब झाले़

फाेन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा फाेन केल्यास आवाज समाेरच्यापर्यंत पाेहचत नाही़

माेबाईल चार्जिंग केल्यानंतर बॅटरी लवकरच लाे हाेते़

चार्जिंग साॅकेट खराब झाले आहे़

माेबाईल पडल्याने डिस्प्ले खराब झाला़

माेबाईल टच स्क्रीन खराब झाला़

माेबाईलबराेबरच आराेग्यही महत्त्वाचे

सततच्या वापरामुळे माेबाईलमध्ये बिघाड आला आहे़ आता सर्वच दुकाने उघडली आहेत़ परिणामी, माेबाईल दुरुस्तीसाठी मी दुकानात जाणार आहे़

- शाम जाधव, माेबाईलधारक

माेबाईल ही महत्त्वाची आणि सतत लागणारी वस्तू आहे़ मात्र, ताे बिघडला तर ऑनलाईन सर्वच कामे ठप्प हाेतात़ संवादही थांबताे़ आता दुकाने सुरु झाल्याने, मी माझा माेबाईल दुरुस्त करायला दिला आहे़

- बालाजी कांबळे, माेबाईलधारक