श्री गुरू हावगीस्वामी मठाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:23+5:302021-06-28T04:15:23+5:30
उदगीर येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत श्री गुरू हावगीस्वामी महाराज मठाच्या धर्मशाळेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

श्री गुरू हावगीस्वामी मठाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देऊ
उदगीर येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत श्री गुरू हावगीस्वामी महाराज मठाच्या धर्मशाळेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे होते. यावेळी मठाधीश शंभूलिंग शिवाचार्य महाराज, पालिकेचे मुख्याधिकारी भरत राठोड, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, शेख समीर, नगरसेविका बबिता भोसले, रेखा कानमंदे, नगरसेवक मंजुरखाँ पठाण, श्रीरंग कांबळे, शेख महेबुब, शमशोद्दीन जरगर, नाना हाश्मी, विजय निटुरे, बाबूराव समगे, सुभाष धनुरे यांची उपस्थिती होती.
साडेसात कोटींचा निधी मंजूर...
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विविध कामांसाठी विशेष बाब म्हणून नगरोत्थान अंतर्गत ७ कोटी ४२ लाखांचा व दलितेतर योजनेअंतर्गत दीड कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यासाठीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच ई- निविदा पूर्ण करून ही कामे सुरू केली जाणार आहेत. येत्या वर्षभरात शहरातील सर्व रस्ते, नाल्या, दलित वस्तीतील रस्ते, अल्पसंख्यांक वस्तीतील रस्ते, मुख्य रस्ते, सभागृह, स्मशानभूमी सुशोभीकरण यासह शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, उड्डाण पुलावरील विद्युत पोल बसविण्याचे कामही लवकरच केले जाणार आहे.