शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरसाठी आम्ही 'विमानानंही' पाणी आणू शकतो, भाजपा खासदार 'हवेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:44 IST

भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधील पाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे.

लातूर - भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधीलपाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे. लातूरकरांच्या पाणीप्रश्नाबाबत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना 2016 मध्ये ट्रेनने लातूरला पाणी आणलं, आता आम्ही विमानानेही पाणी आणू शकतो. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे हे विधान हवेत बोलल्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक विरोधकांकडून व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एखाद्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. 2016 साली मिरजहून रेल्वेद्वारे लातूरमध्ये पाणी आणण्यात आले. जिल्ह्यात टंचाई काळात पाणीस्त्रोत उपलब्ध नसल्याने थेट उजनीहून पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, बैठकावर बैठका आणि प्रस्तावांचा ढीग मंत्रालयात सादर करूनही ही योजना काही मार्गी लागली नाही. त्यामुळे लातूरमध्ये पुन्हा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असले तरी एप्रिल, मे महिन्यातील उन्हाळ्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न होणार असल्याचे दिसून येते. सध्यातरी पाणीटंचाई नाही, पण मार्चनंतर पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ऊस उत्पादक गावात गरज भासल्यास टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे गायकवाड यांनी म्हटले. तसेच लातूर शहरात पाण्याचं नियोजन व्यवस्थीत झालं नाही. वेस्टेज ऑफ वॉटरमुळे शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी परीस्थितीमध्ये चारा अन् पिण्याचं पाणी हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच, 2016 मध्ये आम्ही ट्रेनने पाणी आणलं, आता विमानानेही आम्ही पाणी आणू शकतो. पण, त्याची गरज नाही, असे गायकवाड यांनी म्हटले. दरम्यान, खासदार सुनिल गायकवाड यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.  

टॅग्स :BJPभाजपाSunil Gaikwadसुनिल गायकवाडlaturलातूरWaterपाणी