लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

By हणमंत गायकवाड | Published: March 13, 2024 07:54 PM2024-03-13T19:54:47+5:302024-03-13T19:55:06+5:30

लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी अशुद्ध झाली आहे.

Water supply to Latur MIDC will be shut for three days | लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

लातूर: लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जल वाहिनी अशुद्ध झाल्याने स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसीचापाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. शनिवारी १६ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लातूर एमआयडीसीला मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी प्रकल्पावरून पाईपलाईन करण्यात आलेली आहे. मात्र लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी अशुद्ध झाली आहे. त्यामुळे तिचे स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी,लातूर व अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा १६ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून १९मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

मनपाकडूनही पाण्याची बचत करण्यासाठी उपाय योजना
महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार केले आहे. दर शनिवार ते सोमवार असे तीन दिवस प्रकल्पातून पाणी उचलण्यात येणार नाही. मात्र शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा शहरात केला जाणार आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात येत असल्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र लातूर मनपाने पाणी बचतीसाठी पाणी न उचलण्याचा निर्णय घेतला आहे, मनपाची स्वतंत्र जलवाहिनी आहे, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.

Web Title: Water supply to Latur MIDC will be shut for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.