शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलदाब चाचणीसाठी थांबली १५ हजार घरांची नळजोडणी!

By हरी मोकाशे | Updated: September 25, 2023 17:32 IST

जलजीवन मिशन : आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ६४३ घरांत जोडणी

लातूर : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ लाख ४३ हजार ६४३ घरांमध्ये नळजोडणी देण्यात आली आहे. आणखीन ३० हजार १९६ घरांना नळजोडणी देण्याचे काम शिल्लक आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलदाब चाचणी न झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजार कुटुंबांना अद्यापही नळजोडणी झाली नाही.

प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांना घरपोच, पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एप्रिल २०२१ पासून नळजोडणी केली जात आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८८५ गावे आणि वाडी-तांडे आहेत. वीसपेक्षा अधिक कुटुंब संख्या असलेल्या प्रत्येक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्ह्यात ९३५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील बहुतांश ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत.

लातूर तालुक्यात सर्वाधिक नळजोडणी...तालुका - नळजोडणी - टक्केवारीअहमदपूर - ३७८९३ - ८६.८०औसा - ५४५८३ - ९४.१३

चाकुर - ३०५३४ - ९४.३०देवणी - १५७०३ - ८९.५१

जळकोट - १६२४४ - ९३.९८लातूर - ५६८३१ - ८६.२५

निलंगा - ५३०३४ - ९३.९८रेणापूर - २३३८४ - ९४.१२

शिरूर अनंत. - १४१३४ - ९८.३४उदगीर - ४१३०३ - ९५.०७

एकूण - ३४३६४३ - ९१.९२

दोन विभागांकडे काम...

जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे, तर नळजोडणीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व लघू पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यामुळे या अभियानात दोन्ही विभागांचे कार्य महत्त्वाचे आहे. दरम्यान, जलदाब चाचणीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. ही चाचणी न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.

नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल...जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ३ लाख ७३ हजार ८३९ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ६४३ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत उर्वरित कुटुंबांना नळजोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या जलदाब चाचणीमुळे १५ हजार नळजोडणी थांबली आहे. ती लवकर पूर्ण होईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व लघू पाटबंधारे

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर