क्रीडा संकुलातील वॉकिंग ट्रॅक अस्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:27 AM2021-06-16T04:27:04+5:302021-06-16T04:27:04+5:30

लातूर : अनलॉक झाल्याने जिल्हा क्रीडा संकुल सुरू झाले आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रीडा संकुलावर खेळाडूंसह चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची ...

The walking track in the sports complex is unclean | क्रीडा संकुलातील वॉकिंग ट्रॅक अस्वच्छ

क्रीडा संकुलातील वॉकिंग ट्रॅक अस्वच्छ

googlenewsNext

लातूर : अनलॉक झाल्याने जिल्हा क्रीडा संकुल सुरू झाले आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रीडा संकुलावर खेळाडूंसह चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमी गर्दी असते. परंतु, संकुलातील वॉकिंग ट्रॅक अस्वच्छ झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. क्रीडा संकुलात सकाळ-सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांसह महिला चालण्यासाठी येतात. क्रीडा संकुलातील वॉकिंग ट्रॅकवर झाडांच्या पानांची गळती होऊन अस्वच्छता पसरली आहे. काही भागात हलकासा पाऊस झाला तरी ट्रॅकवर असणाऱ्या मातीमुळे नागरिकांचे पाय घसरत आहेत. काही नागरिक फास्ट वॉकिंग करतात. त्यांना चालताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाय घसरत असल्याने अनेक नागरिकांची घसरगुंडी झाली आहे. हलकासा पाऊस झाला तरी संकुलातील वॉकिंग ट्रॅकवर पाय घसरत आहेत. त्यामुळे संपूर्ण वॉकिंग ट्रॅकची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी खेळाडू व नागरिकांकडून होत आहे.

आठवडा झाला तरी स्वच्छता मोहीम नाही

अनलॉक झाल्यामुळे गत आठवड्यातच क्रीडा संकुल चालण्यासाठी येणारे नागरिक व खेळाडूंसाठी खुले करण्यात आले. मात्र, आठवडा झाला तरी संकुलाच्या वॉकिंग ट्रॅकची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: The walking track in the sports complex is unclean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.