बेलकुंडच्या सरपंचपदी विष्णू कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST2021-02-12T04:18:55+5:302021-02-12T04:18:55+5:30
बेलकुंड ग्रामपंचायत ही ९ सदस्यांची आहे. येथील निवडणुकीत विष्णू कोळी यांच्या ग्रामविकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले होते. गुरुवारी ...

बेलकुंडच्या सरपंचपदी विष्णू कोळी
बेलकुंड ग्रामपंचायत ही ९ सदस्यांची आहे. येथील निवडणुकीत विष्णू कोळी यांच्या ग्रामविकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले होते. गुरुवारी सरपंच व उपसरपंचाच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी जे.जी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी सरपंचपदासाठी विष्णू कोळी व भागीरथी वगरे यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे मतदान घेण्यात आले. त्यात कोळी यांना ६ तर वगरे यांना ३ मते मिळाली. त्यामुळे कोळी यांची निवड झाली.
उपसरपंचपदासाठी सचिन पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य अपसिंगेकर, समाधान कांबळे, मंदाकिनी जाधव, निर्मला साळुंखे, केशरबाई शिंदे, प्रिया कांबळे, ग्रामसेवक विकास फडणीस यांच्यासह माजी सरपंच कोंडाबाई कांबळे, रसूल पठाण, अमित सोलापुरे, सुरज पाटील, रमेश पांढरे, बालेखां पठाण, मैनुद्दीन पठाण, गणेश यादव, कैलास कांबळे, बलभीम बंडगर, दत्तू हलकरे, महेश साळुंखे, शहाजी वाघमारे, सतीश पाटील, भादा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार कमाल शेख, पो.कॉ. चंद्रकांत सूर्यवंशी व नागरिक उपस्थित होते.