सोयाबीन बियाण्यामध्ये गावे बनली स्वयंपूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:40+5:302021-05-13T04:19:40+5:30
शेतकरी गटाच्या माध्यमातून उपक्रम जेवळी येथील शेतकरी प्रशांत रेड्डी यांनी आपल्या शेतकरी गटाच्या माध्यमातून एक हजार बॅग विविध वाणांच्या ...

सोयाबीन बियाण्यामध्ये गावे बनली स्वयंपूर्ण !
शेतकरी गटाच्या माध्यमातून उपक्रम
जेवळी येथील शेतकरी प्रशांत रेड्डी यांनी आपल्या शेतकरी गटाच्या माध्यमातून एक हजार बॅग विविध वाणांच्या तयार केल्या आहेत. याशिवाय नागझरी येथील परमेश्वर पवार यांनीही पाचशेहून अधिक बॕॅग शेतकरी कंपनीच्या माध्यमातून तयार केलेल्या आहेत. त्यामुळे या गावांतील बियाण्याची गरज भागलेली आहे.
पोकरातून बीजोत्पादन कार्यक्रम फायदेशीर
पोकरा योजनेतून नागझरी, जेवळी, रायवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी महाबीज व इतर खाजगी कंपन्यांकडील पायाभूत बीयाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविला आहे. यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात आले आहे. बियाणेनिर्मितीमध्ये गावे स्वयंपूर्ण बनली आहेत. बाजारभाव जास्त असतानाही कृषी विभागाच्या आवाहनास चांगला प्रतिसाद लाभला आणि अडीच हजार क्विंटल बियाणे तयार करता आले असल्याचे कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी सांगितले.