राज्य साहित्य, संस्कृती मंडळ सदस्यपदी विलास सिंदगीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:39+5:302021-05-30T04:17:39+5:30

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ...

Vilas Sindgikar as a member of Rajya Sahitya, Sanskriti Mandal | राज्य साहित्य, संस्कृती मंडळ सदस्यपदी विलास सिंदगीकर

राज्य साहित्य, संस्कृती मंडळ सदस्यपदी विलास सिंदगीकर

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे. त्यात सदस्य म्हणून साहित्यिक, कवी विलास सिंदगीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा तीन वर्षांचा अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत कालावधी राहणार आहे.

या निवडीबद्दल सिंदगीकर यांचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, प्राचार्य डॉ. माधव गादेकर, लसाकमचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डाॅ. संजय गायकवाड, राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य शिवा कांबळे, मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे संगम टाले, मसापचे शाखाध्यक्ष एम.जी. मोमीन, खादरभाई लाटवाले आदींनी स्वागत केले.

Web Title: Vilas Sindgikar as a member of Rajya Sahitya, Sanskriti Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.