पीडित महिलेची नदीत उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:29+5:302020-12-30T04:26:29+5:30

पाेलिसांनी सांगितले की, अहमदपूर शहरात राहणाऱ्या एका महिलेवर किशन रेणुकादास उगाडे ४० रा. इंदिरा नगर याने साेमवार, २८ डिसेंबर ...

Victim commits suicide by jumping into river | पीडित महिलेची नदीत उडी मारुन आत्महत्या

पीडित महिलेची नदीत उडी मारुन आत्महत्या

पाेलिसांनी सांगितले की, अहमदपूर शहरात राहणाऱ्या एका महिलेवर किशन रेणुकादास उगाडे ४० रा. इंदिरा नगर याने साेमवार, २८ डिसेंबर राेजी ११.३० वाजताच्या सुमारास अत्याचार केला. सदरची घटना काेणाला सांगितल्यास जिवे मारुन टाकताे, अशी धमकी दिली. आपल्यावर झालेला अत्याचार पीडित महिलेच्या जिव्हारी लागला. हा अवमान सहन न झाल्याने, अहमदपूर शहरानजीक असलेल्या वाकी नदीच्या पाण्यात उडी घेऊन त्यांनी आपले जीवन संपविले. याबाबत मयत महिलेच्या सुनेने दिलेल्या तक्रारीवरुन किशन रेणुकादास उगाडे याच्याविराेधात अहमदपूर पाेलीस ठाण्यात मंगळवारी गु.र.नं. ४२२/ २०२० कलम ३७६,३६६, ३०६, ३२३, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पाेलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पाेलीस निरीक्षक सुनील बिर्ला करीत आहेत.

Web Title: Victim commits suicide by jumping into river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.