१५ हजारांच्या दारूसह साडेचार लाखांचे वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:23+5:302021-05-23T04:19:23+5:30
शुक्रवारी सकाळी लातूरहून चारचाकी (एमएच २५, आर ८५८४) वाहन बीड जिल्ह्यातील बाभळगावकडे भरधाव वेगाने जात होते. तेव्हा पोलीस निरीक्षक ...

१५ हजारांच्या दारूसह साडेचार लाखांचे वाहन जप्त
शुक्रवारी सकाळी लातूरहून चारचाकी (एमएच २५, आर ८५८४) वाहन बीड जिल्ह्यातील बाभळगावकडे भरधाव वेगाने जात होते. तेव्हा पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना सदरील वाहनाबाबत संशय आल्याने त्यांनी तातडीने रेणापूर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या नाकाबंदीवरील सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोलीस उपनिरीक्षक नागसेन सावळे, पोना. किरण शिंदे, अनंत बुधडकर, रावसाहेब तांदळे आदी कर्मचाऱ्यांना सूचना केली. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदरील गाडीला थांबून तपासणी केली असता गाडीमध्ये अवैधरीत्या दोन बॉक्स विदेशी दारू (किंमत १५ हजार ३६०) आढळून आली. सदरील दारू व वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी संतोष साहेबराव कांबळे, जगन्नाथ पंढरी करपे, दत्ता बाबुराव ढोणे (सर्व जण रा. बाभळगाव, ता. अंबाजोगाई) यांच्याविरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===Photopath===
220521\img-20210522-wa0018.jpg
===Caption===
गाडीमधील अवैद्य पकडलेल्या दारू सह आरोपी व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड पोलीस उपनिरीक्षक नागसेन सावळे व पोलीस कर्मचारी