उदगिरात साडेतीन लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त
By हरी मोकाशे | Updated: February 4, 2023 19:35 IST2023-02-04T19:35:27+5:302023-02-04T19:35:43+5:30
गुटखा आणि वाहन जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगिरात साडेतीन लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त
उदगीर : शहरातील बिदर रोडवरील वळण रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे चौकात येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून शनिवारी पहाटे वाहन तपासणी सुरु होती. दरम्यान, एका वाहनात ३ लाख ६८ हजार ९५८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. तो गुटखा आणि वाहन जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शनिवारी पहाटे विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून बिदर रिंग रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौकात कर्नाटकातून येणाऱ्या वाहनाची तपासणी सुरु होती. यावेळी एमएच ०४, एडी ३७६३ या वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यात ३ लाख ६८ हजार ९५८ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आढळून आला. पोलिसांनी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा व वाहन जप्त केले. याप्रकरणी पोलीस नाईक अजय भंडारे यांच्या तक्रारीवरुन उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी इसा रहेमतुल्ला तांबोळी व जिलानी मन्नान मनियार (रा. अहमदपूर) या दोघांविरुध्द गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. राहुलकुमार भोळ हे करीत आहेत.