पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात वाहन ढकल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:35+5:302021-02-07T04:18:35+5:30
हे आंदोलन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, अभय सोळुंके, शिवसेनेचे अविनाश रेशमे, राष्ट्रवादीचे दिलीप पाटील, रिपाइंचे विलास सूर्यवंशी ...

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात वाहन ढकल आंदोलन
हे आंदोलन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, अभय सोळुंके, शिवसेनेचे अविनाश रेशमे, राष्ट्रवादीचे दिलीप पाटील, रिपाइंचे विलास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ, शेकापचे नारायण सोमवंशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, अभय साळुंके, प्रा. दयानंद चोपणे, रिपाइंचे विलास सूर्यवंशी, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष सय्यद शाहरुख, टिपू सुलतान संघटनेचे तालुकाध्यक्ष सबदर काद्री, वीर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, महिला तालुकाध्यक्ष पानफुलाताई पाटील, पुजारी, प्रशांत वांजरवाडे आदींच्या सह्या आहेत.
केंद्र सरकारवर संताप...
इंधन दरवाढीस केंद्र सरकार जबाबदार असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. केंद्र सरकारने इंधन दरवाढ रोखावी. तसेच मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाहन ढकलत हे आंदोलन करण्यात आले.