यावेळी बोलताना डॉ. घनश्याम दरक म्हणाले, कोरोना हा आजार इतर आजारांपेक्षा भयंकर जरी असला तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. शासनाने घालून दिलेले नियम पालन करणे आवश्यक आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने आमच्या कार्याची दखल घेत सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
यावेळी बोलताना वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा म्हणाले, वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गत ७ वर्षांपासून लातूर जिल्ह्यात पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिष्ठानने नेहमीच अभिनव उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावेळी उमाकांत मुंडलीक, अजित चिखलीकर यांच्या हस्ते सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करून सदर उपक्रम राबविण्यात आला.
याशिवाय, वसुंधरा प्रतिष्ठानचे सदस्य राहुल माशाळकर, कृष्णा काळे, अभिजित कोरनुळे यांच्या पुढाकाराने एमआयटी रुग्णालयात सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करून त्यांच्या कोविड काळातील योगदानाबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल वळसने, अनिल सूर्यवंशी, प्रवीण कुंभार, प्रसाद कोळी, प्रसाद कुंभार आदींनी परिश्रम घेतले.