लातूर शहरात पाच, तर ग्रामीण भागात जिल्ह्यात १२ ठिकाणी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:34+5:302021-05-26T04:20:34+5:30

लातूर महानगरपालिकेच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, यशवंत शाळा, प्राथमिक नागरी केंद्र, साळेगल्ली, दयानंद महाविद्यालय, बार्शी रोड, ...

Vaccination at five places in Latur city and at 12 places in rural areas | लातूर शहरात पाच, तर ग्रामीण भागात जिल्ह्यात १२ ठिकाणी लसीकरण

लातूर शहरात पाच, तर ग्रामीण भागात जिल्ह्यात १२ ठिकाणी लसीकरण

लातूर महानगरपालिकेच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, यशवंत शाळा, प्राथमिक नागरी केंद्र, साळेगल्ली, दयानंद महाविद्यालय, बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर, शिवाजी शाळा लेबर कॉलनी, लातूर या पाच ठिकाणी कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाईल. तसेच हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्करचा प्रलंबित डोस दिला जाणार आहे. पहिला डोस ऑनस्पॉट सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहील. शहरातील इतर लसीकरण केंद्र बंद राहतील. असे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

लस उपलब्धतेनुसार पहिला व दुसरा डोस...

ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याची सुविधा आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व क्षेत्रात लसीच्या उपलब्धतेनुसार शिवाय सुक्ष्म कृती आराखड्यानुसार कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ४५ वर्षे व त्यापुढील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे. या लसीकरणाबाबत अडचण असल्यास ०२३८२- २२३००२ या कोविड हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

Web Title: Vaccination at five places in Latur city and at 12 places in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.