सिकंदरपूर येथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:43+5:302021-07-10T04:14:43+5:30
लातूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून तालुक्यातील सिकंदरपूर येथे १८ वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी खोपेगाव उपकेंद्रामार्फत कोविड ...

सिकंदरपूर येथे लसीकरण मोहीम
लातूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून तालुक्यातील सिकंदरपूर येथे १८ वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी खोपेगाव उपकेंद्रामार्फत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गावातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजळे, गंगापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप ईगे, पोलीस उपनिरीक्षक टी. डी. चेरले, पोलीस जमादार उत्तम देवके, डॉ. चंद्रशेखर जाधव, सरपंच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माधव गंभीरे, सरपंच रेश्मा गंभीरे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी उपसरपंच पिराजी इटकर, ग्रामसेवक आर. एम. चलमले, सदस्य उद्धवराव पाटील, सुरेश इटकर, सुरेश लष्कर, गजानन बोयने, पृथ्वीराज ताटे, विनोद पाटील, संदीप पुणेकर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पवार, खराटे, नरहरे, मुख्याध्यापक एल. एस. स्वामी, आर. एल. आलापुरे, एस. बी. कोडगे, व्ही. बी. गायकवाड, सुनील गायकवाड, माने, महेश गंभीरे, आशा कार्यकर्ती मंगल बोकने, देवनंदा बोयणे, अंगणवाडी ताई गरगट्टे, मनिषा परमेश्वर शिंदे, अलका राऊतराव, रंजना माळहिप्परगे, अनिता पवार, भास्कर गरगट्टे यांनी परिश्रम घेतले.