मुरुड येथे लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:46+5:302021-01-17T04:17:46+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप दादा नाडे, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विकास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ...

मुरुड येथे लसीकरणास सुरुवात
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप दादा नाडे, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विकास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, संचालक अमर मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेसाहेब सवई, सहायक पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी. एस. पटाडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, हनुमंत नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, दीपक पठाडे, रघुनाथ शिंदे, उद्धव सवासे, भारत लाड, वैभव सापसोड, निलेश फेरे, राजेंद्र मस्के, चंद्रकांत मोरे, रामा गोरे, ब्रह्मानंद जाधव, प्रताप खोसे, समाधान गायकवाड उपस्थित होते.
यावेळी आ. धीरज देशमुख म्हणाले, कोरोनाचा अहवाल लवकरात लवकर मिळावा म्हणून पालकमंत्री अमित देशमुख यांनी जवळपास प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू केली. आरोग्य क्षेत्रात आणि आरोग्य शिक्षणात अनेक पायाभूत सुविधा त्यांनी सुरू केल्या. जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचाही त्यांचा मानस आहे. सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे.
तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान-जय किसान’ हा नारा दिला होता. त्याकाळी जवान आणि किसान हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे होते. आता हा नारा आपल्याला जय जवान-जय किसान, जय आरोग्य कर्मचारी, जय पोलीस, असा करणे संयुक्तिक ठरणार आहे. कारण कोरोनाच्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनी स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून सेवा दिली. त्यांचा त्याग, त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, अशा भावनाही धीरज देशमुख यांनी व्यक्त केल्या.