कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:03+5:302021-08-27T04:24:03+5:30
कॉन्टॅक्ट लेन्स दर सहा तासांनी काढून ठेवली पाहिजे. अनेकजण ती काढून न ठेवता तसेच झोप घेतात. यामुळे इन्फेक्शन होण्याची ...

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा
कॉन्टॅक्ट लेन्स दर सहा तासांनी काढून ठेवली पाहिजे. अनेकजण ती काढून न ठेवता तसेच झोप घेतात. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. वापरण्याचे जे प्रमाण एकक आहे, त्यानुसार कॉन्टॅक्ट लेन्स वापरायला हवी, असेही नेत्रतज्ज्ञांनी सांगितले आहे.
चष्म्याला करा बाय बाय....
कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर आता चांगलाच वाढला आहे; परंतु डॉक्टरांनी सांगितलेल्या तंत्रानुसार त्याचा वापर करायला हवा. दर सहा तासांनी त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. चष्म्याला पर्याय म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स आहे. त्यामुळे आता चष्म्याला बाय-बाय होत आहे.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात....
कॉन्टॅक्ट लेन्स चष्म्याला पर्याय आहे; पण योग्य खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यक आहे. दर सहा तासांनी ती काढून ठेवून स्वच्छ करावी. जेणेकरून डोळ्यांना कोणतीही इजा होणार नाही. कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यांवर तशीच न ठेवता झोपी जाऊ नये. आठवड्यातून एक दिवस प्रोटिन टॅब्लेट पॉकेटमध्ये लेन्स ठेवणे आवश्यक आहे. लेन्स सोल्युशनचा वापर करणे गरजेचे आहे.