शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिले द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:05+5:302021-07-29T04:21:05+5:30

गेल्‍या गळीत हंगामात जिल्‍ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण ९ साखर कारखान्‍यांनी ३१ लाख ६७ हजार मे. टन उसाचे ...

Usbiles should be given to farmers as per FRP | शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिले द्यावी

शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिले द्यावी

गेल्‍या गळीत हंगामात जिल्‍ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण ९ साखर कारखान्‍यांनी ३१ लाख ६७ हजार मे. टन उसाचे गाळप केले. त्‍यापैकी मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास-२ आणि रेणा या चार कारखान्‍यांनी १८ लाख ५७ हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना उसाची बिले देण्‍यात यावीत असे, शासनाचे निर्देश असतानाही चार कारखान्‍यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत उसाचे बिल अदा केले आहे. गेल्‍या दीड दोन वर्षापासून कोरोनाच्‍या संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला मदत करणे ही काळाची गरज असतानाही साखर कारखान्‍यांनी शासनाच्‍या नियमानुसार एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिले देणे गरजेचे आहे. मात्र अद्यापपर्यंत देण्‍यात आलेला नाही. दहा दिवसांच्‍या आत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यावर रक्‍कम जमा करावी अन्‍यथा ९ ऑगस्‍ट क्रांतीदिनी संबंधित कारखान्‍याच्‍या कार्यालयासमोर आंदोलन करण्‍यात येईल, असा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेश कराड यांनी साखर आयुक्‍त, साखर संचालक, प्रादेशिक साखर सहसंचालक, जिल्‍हाधिकारी, तहसीलदार, साखर कारखान्‍याच्‍या कार्यकारी संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Usbiles should be given to farmers as per FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.