शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द-चिकाटीचा विजय! निलंग्याच्या सूरजची दुसऱ्यांदा यूपीएससीत बाजी, ७०२ वा रँक मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:51 IST

यूपीएससीत निलंग्याचा सूरज सूर्यवंशी पुन्हा यशस्वी; क्रीडा मंत्रालयातून आता आयएएस पदाकडे वाटचाल

निलंगा : सुरुवातीला दोनदा अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नात युपीएससीत यश मिळवित भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयात सहाय्यक संचालक पदाला गवसणी घातली. मात्र, मनातील आयएएस व्हायचेयं ही जिद्द शांत बसू देत नव्हती. भोपाळला ट्रेनिंग घेत अभ्यास आणि अनुभवाच्या बळावर सूरजने दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली आहे.

निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील माणिक सूर्यवंशी हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सध्या भादा येथे कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले असून थोरला सुरज. सुरज यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. वडील ग्रामसेवक असल्याने वारंवार बदली होत असल्यामुळे त्यानंतरचे दहावीपर्यंत शिक्षण उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण केले. तद्नंतर पुणे येथे सामाजिक शास्त्रात नेट- सेट उत्तीर्ण झाले. एक वर्ष तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केले. मात्र, आपण आएएस व्हायचे अशी बालपणापासून मनीषा असल्याने दिल्ली गाठली आणि तिथे अभ्यास सुरु केला. सुरुवातीच्या दोन परीक्षांत अपयश आले. त्यामुळे ते डगमले नाहीत. कठोर परिश्रम सुरुच ठेवले आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्यामुळे भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयात सहाय्यक संचालक पदावर निवड झाली. त्यानुसार सध्या ते भोपाळ येथे ट्रेनिंग घेत आहेत.दरम्यान, आपण आयएएस व्हायचे म्हणून अनुभवाच्या जोरावर परीक्षेची तयारी केली आणि देशात ७०२ वा रँक मिळवित पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली.

जिद्दीला यशाचे फळवेळेचे नियोजन करुन अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार अभ्यास करीत असे. जिद्दीला यशाचे फळ मिळाले आहे. ग्रामीण युवकांनी कष्ट आणि नियोजन ठेवल्यास निश्चित यश मिळते.- सूरज सूर्यवंशी.

जीवनाचे सार्थक झालेसूरज दररोज १४ तास अभ्यास करीत असे. गतवर्षी तो युपीएससी उत्तीर्ण झाल्याने मुलगा क्लास वन झाला. याचा आनंद होता. मात्र, आणखीन चांगल्या पदावर पोहोचण्यासाठी पुन्हा तयारी करुन यश मिळविले. त्याचा खूप आनंद झाला आणि आमच्या जीवनाचे सार्थक झाले.- माणिक सूर्यवंशी, वडील.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilanga's Suraj triumphs again in UPSC with perseverance, secures 702nd rank.

Web Summary : Suraj Suryavanshi from Nilanga, after initial failures, cracked UPSC again. Currently training in Bhopal after becoming Assistant Director, Ministry of Sports, he secured 702nd rank, fulfilling his IAS dream through hard work and experience.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगlaturलातूर