सात गुन्ह्यांचा उलगडा; सहा आराेपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST2021-08-15T04:21:54+5:302021-08-15T04:21:54+5:30
पोलिसांनी सांगितले, पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याबाबत विशेष सूचना केल्या हाेत्या. दरम्यान, जिल्ह्यात घडलेल्या ...

सात गुन्ह्यांचा उलगडा; सहा आराेपींना अटक
पोलिसांनी सांगितले, पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याबाबत विशेष सूचना केल्या हाेत्या. दरम्यान, जिल्ह्यात घडलेल्या मालविषयक गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेअंतर्गत पथकातील पाेलीस अधिकारी, अंमलदारांना खबऱ्यामार्फत माहिती काढून ठिकठिकाणी छापेमारी केली. यामध्ये एकूण सात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. याबाबत अक्षय राम तेलंगे (१९ रा. ब्राह्मण गल्ली, औसा), साहील महेबूब सय्यद (२१ रा. संजयनगर, औसा), मधुकर आबा काळे (२६ रा. खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद), भय्या आबा काळे (२२ रा. खामकरवाडी, ता. वाशी जि. उस्मानाबाद), रमेश सर्जेराव पवार (२६, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) आणि दिलीप शिवराम गायकवाड (२६, रा. सायळराेड, लाेहा, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली. यामध्ये अक्षय तेलंगे आणि साहील सय्यद याने पाेलीस ठाणे विवेकानंद चाैक आणि औसा हद्दीत गुन्हे केल्याचे कबूल केले आहे, तर मधुकर काळे, भय्या काळे, रमेश पवार यांनी एमआयडीसी, मुरुड पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केलेले आहेत. दिलीप गायकवाड याने नांदेड जिल्ह्यातील लाेहा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
यावेळी पाेलिसांनी १२ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दाेन माेटारसायकल, औसा ठाण्याच्या हद्दीतील एक माेटारसायकल, एमआयडीसी हद्दीतील एक ट्रक, काही टायर, मुरुड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्राेल, डिझेल चाेरण्याचे साहित्य, कॅन, पाइप, हातपंप, लाेहा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एक दुचाकी पाेलिसांनी जप्त केली आहे.