लातूर बस स्थानकात अज्ञात प्रवाशाचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 07:40 IST2019-04-26T07:40:11+5:302019-04-26T07:40:20+5:30

लातूर मध्यवर्ती बस स्थानकात अज्ञातानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

Unknown passenger firing at Latur bus station | लातूर बस स्थानकात अज्ञात प्रवाशाचा गोळीबार

लातूर बस स्थानकात अज्ञात प्रवाशाचा गोळीबार

लातूरःलातूर मध्यवर्ती बस स्थानकात अज्ञातानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमधील प्रवाशानंच गोळी झाडल्यानं इतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्या प्रवाशानं गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे या गोळीबारात हल्लेखोर प्रवासीच जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपीनं पोबारा केला असून, पोलिसांनी बस स्थानकाच्या चारही बाजूंनी सुरक्षेचा घेरा बनवला आहे.

पंढरपूर-हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री साडेअकराच्यादरम्यान लातूर स्थानकात आली असता, कंडक्टर आणि ड्रायव्हर अल्पोपहारासाठी खाली उतरले. त्याचदरम्यान बसमधून एका प्रवाशानं खिडकीतून बाहेर असलेल्या एका व्यक्तीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी खिडकीच्या रॉडला आदळून पुन्हा हल्लेखोरालाच लागली, या हल्ल्यात तो स्वतःच जखमी झाला. त्यानंतर तो आरोपी लागलीच परागंदा झाला.

पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पल पोलीस अधीक्षक हिंमत जाधव हे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी गोळी झाडण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली. हल्लेखोराला नक्की कोणावर निशाणा साधायचा होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.  

Web Title: Unknown passenger firing at Latur bus station

टॅग्स :laturलातूर