उदगीरमध्ये ४३ बाधित तर १७ जणांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:29+5:302021-05-08T04:20:29+5:30
तीन कोरोना बाधीत रुग्णाचा तर एका नॉन कोव्हीड रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची महिती सूत्रांनी दिली. येथील कोवीड रुग्णालयात ...

उदगीरमध्ये ४३ बाधित तर १७ जणांना सुटी
तीन कोरोना बाधीत रुग्णाचा तर एका नॉन कोव्हीड रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची महिती सूत्रांनी दिली. येथील कोवीड रुग्णालयात शुक्रवारी आरटीपीसीआर तपासणीत तीस रुग्ण बाधीत आढळले असुन ॲन्टीजण तपासणीमध्ये तेरा रुग्ण बाधित आढळले आहेत तर इतर ठिकणाहुन चार रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सतरा रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण दोनशे रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. कोविड रुग्णालयात ६६ रुग्णावर, अरुणा अभय ओसवाल संस्थेत १३,पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात १२,तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर येथे २९ ,तोंडार पाटी येथील कोवीड केअर सेंटर मध्ये २५ , आणि उदगीर शहरातील मंजुर असलेल्या खाजगी कोवीड रुग्णालयात ९१ तसेच होम आयसोलेशन मध्ये ६२ असे एकूण २९८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार चालू आहेत अशी माहीती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरदास यांनी दिली.