लातूर शहरातून दुचाकीची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:37+5:302021-06-22T04:14:37+5:30
लातूर : शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत चाेरांच्या टाेळ्या सक्रिय झाल्या असून, दुचाकी चाेरीबराेबरच घरफाेडीच्या घटनाही अलिकडे ...

लातूर शहरातून दुचाकीची चाेरी
लातूर : शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत चाेरांच्या टाेळ्या सक्रिय झाल्या असून, दुचाकी चाेरीबराेबरच घरफाेडीच्या घटनाही अलिकडे वाढल्या आहेत. लातूर शहरातून दाेन दुचाकी पळविल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर, गांधी चाैक पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी महादेव शहाजीराव मुळे (६३, रा. गणेशनगर, औसा राेड, लातूर) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच २४ एस़ ४९९५) ही घराच्या पार्किंगमध्ये लावली हाेती. ती चाेरट्यांनी पळवल्याची घटना बुधवार, १६ जून राेजी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकासमाेरुन दुचाकी पळवली
लातूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमाेर उभी केलेली दुचाकी पळविल्याची घटना शुक्रवार, ४ जून राेजी घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात शनिवारी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी किरण रामदास पवार (३९, रा. वैभव नगर, लातूर) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच २४ एए ५९३३) ही बसस्थानकासमाेर थांबवली हाेती. त्यानंतर ते मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी गेले असता, चाेरट्यांनी त्यांची दुचाकी पळवली. याविषयी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.