दुचाकीची धडक; एक गंभीर जखमी होऊन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:17 IST2021-01-02T04:17:02+5:302021-01-02T04:17:02+5:30
लातूर : भरधाव वेगात दुचाकी चालवत पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात फिर्यादीची आई गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू ...

दुचाकीची धडक; एक गंभीर जखमी होऊन मृत्यू
लातूर : भरधाव वेगात दुचाकी चालवत पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात फिर्यादीची आई गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. नरसिंग रामभाऊ राऊतवार (रा. पांढरी खरोळा, ता. रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी क्रमांक (एमएच २४ एस ५३४०)च्या स्वाराविरुद्ध रेणापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माचेवाड करत आहेत.
बांधावर पाईप टाकल्याने मारहाण
लातूर : शेतातील बांधावर पाईप का टाकला, असे विचारत फिर्यादीच्या पत्नी व मुलाला धक्काबुक्की करून, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सतीश सिराप्पा वाडीकर व अन्य दोघांविरुद्ध किल्लारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष येराप्पा वाडीकर (रा. लोहता, ता. औसा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.