ऑनलाइन गुणदानामध्ये दोन टक्के शाळांच्या चुका; मूल्यांकन पूर्णत्वाकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:03+5:302021-07-14T04:23:03+5:30
मुख्याध्यापक म्हणतात दहावीची मूल्यमापन प्रक्रिया आमच्या शाळेकडून पूर्ण झाली आहे. शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली ...

ऑनलाइन गुणदानामध्ये दोन टक्के शाळांच्या चुका; मूल्यांकन पूर्णत्वाकडे!
मुख्याध्यापक म्हणतात
दहावीची मूल्यमापन प्रक्रिया आमच्या शाळेकडून पूर्ण झाली आहे. शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, हे गुणदान ऑनलाइन सादर करण्यात आले आहे. - इस्माईल शेख
मूल्यमापन पद्धतीमध्ये नववीचे मार्क ग्रहित धरून दहावीचा निकाल तयार करण्यात आला आहे. गुणांकन करण्यासाठी इंटरनेटची अडचण होती; परंतु त्यावरही मात करून मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. आमच्या शाळेने ऑनलाइन मूल्यांकन सादर केले आहे. त्यात कसलीही त्रुटी नाही. - एच.ई. शेळके
१२ शाळांच्या मूल्यांकनात किरकोळ त्रुटी
विषय बदल, ग्रेडमध्ये बदल, अंतर्गत मूल्यमापनात काही किरकोळ चुका, प्रात्यक्षिक गुणदानामध्ये थोडा बदल आदी किरकोळ चुका झाल्या होत्या. अशा शाळांची संख्या दहा ते बाराच्या आसपास होती. त्यांनीही त्यात दुरुस्ती करून मूल्यांकन प्रक्रिया सादर केली आहे.
मंडळाने दुरुस्तीसाठी दिला होता वेळ
ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रिया सादर करण्याची २ जुलै मुदत होती. या मुदतीत ९९ टक्के शाळांनी ऑनलाइन माहिती सादर केली. त्याची पडताळणी केल्यानंतर काही किरकोळ चुका आढळल्या होत्या.
किरकोळ चुकांची दुरुस्ती करून सर्वच शाळांनी मंगळवारअखेर माहिती सादर केलेली आहे.
मूल्यांकन प्रक्रियेची सर्व माहिती सादर झाल्याने १ लाख १० हजार ३५४ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील ९८ टक्के शाळांनी अचूक माहिती सादर केली होती. एक-दोन टक्के शाळांच्या किरकोळ चुका होत्या. त्या मंगळवारअखेर दुरुस्त करण्यात आल्या आहेत. लातूर बोर्डाकडून केलेल्या सूचनेनुसार शाळांनी माहिती सादर केलेली आहे. - संजय पंचगल्ले, सहसचिव लातूर बोर्ड.