खून प्रकरणातील दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:15 IST2021-07-04T04:15:04+5:302021-07-04T04:15:04+5:30
पोलिसांनी सांगितले, मृताची पत्नी मंगल हणमंत केंद्रे व पती हणमंत केंद्रे यांचे वाद होत असत. यातून गुरुवारी सायंकाळी खून ...

खून प्रकरणातील दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी
पोलिसांनी सांगितले, मृताची पत्नी मंगल हणमंत केंद्रे व पती हणमंत केंद्रे यांचे वाद होत असत. यातून गुरुवारी सायंकाळी खून केल्याची कबुली मंगल केंद्रे यांनी दिली. याप्रकरणी मृताचे वडील दादाराव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपी काशिनाथ सूर्यकांत गताटे, सूर्यकांत काशिनाथ गताटे, मंगल हनुमंत केंद्रे (सर्वजण रा. देऊळवाडी, ता. उदगीर) व दत्ता बिराजदार (रा. चिघळी, ता. उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री कलम ३०२ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. एक मुख्य आरोपी आणि अन्य एक जण फरार आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गायके हे करीत आहेत.