मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या, १६ मोबाईल जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: April 24, 2025 02:03 IST2025-04-24T02:03:11+5:302025-04-24T02:03:25+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत माेबाइल चाेरणारी आणि विक्री करणारी चाेरट्यांची टाेळी सक्रीय झाली आहे. यातील आराेपींच्या अटकेचे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले.

मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या, १६ मोबाईल जप्त
लातूर राजकुमार जाेंधळे / लातूर : माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील दाेघांना एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिस पथकाने बुधवारी चाेरीतील १६ माेबाइलसह अटक केली. चाेरीतील माेबाइल विक्रीसाठी फिरताना त्यांना पकडण्यात आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत माेबाइल चाेरणारी आणि विक्री करणारी चाेरट्यांची टाेळी सक्रीय झाली आहे. यातील आराेपींच्या अटकेचे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटन शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चाेरट्यांनी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दाेघे संशयीत आराेपी चाेरीतील माेबाइल विक्री करण्यासाठी फिरत आहेत, अशी माहिती खबऱ्याने दिली.
यानंतर पाेलिसांनी एमआयडीसी परिसरातील किर्ती चाैकातून दाेघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस ठाण्याला आणण्यानंतर विश्वासात घेत त्यांची कसून चाैकशी केली. बॅगमधील मोबाईल हे लातुरातील वेगवेगळया परिसरातून चाेरल्याचे कबूल केले. ओम मुरलीधर सूर्यवंशी (वय १९) आणि सतिष नरसींग माने (वय २२, रा. हाडको कॉलनी लातूर) अशी त्यांनी आपली नावे सांगितली. दाेघांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तपास अंमलदार गोविंद चामे हे करीत आहेत.
ही कामगिरी पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहर डीवायएसपी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी ठाण्याचे पो.नि. सुधाकर देडे, पोउपनि. प्रशांतसिंग राजपूत, स.फौ. बेल्लाळे, शिंगाडे, मुळे, भोसले, मस्के, ओगले, सोनकांबळे यांच्या पथकान केली.