वैद्यकीय विज्ञान संस्थेतील परिचारिकांचे दोन तास काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:39+5:302021-06-22T04:14:39+5:30
आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्य खजिनदार राम सूर्यवंशी, पांडुरंग गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष संजीव लहाने, ...

वैद्यकीय विज्ञान संस्थेतील परिचारिकांचे दोन तास काम बंद
आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्य खजिनदार राम सूर्यवंशी, पांडुरंग गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष संजीव लहाने, उणिता देशमाने, सचिव रेणुका रेड्डी, सहखजिनदार प्रतिभा जमदाडे, विवेक वागलगावे, प्रशांत केंद्रे, शरद चव्हाण, भागवत देवकते, विष्णू लहाने, शोभा जाधव, किरण निकम, आशा मिसाळ, मीनाक्षी गोडबोले, नितीन गव्हाणे, पूजा गडदे, संध्या पाटील, रवींद्र मिसाळ, सुनीता डावकर, दीपक शिंदे, संभाजी केंद्रे, गोविंद शेळके, जगन्नाथ कोरके, मारुती हुलसुरे, रघुवीर फुलसे, मकरंद दिघे, रेणुका बोरोळे, मीनाक्षी गुळवे आदी सहभागी झाले होते.
सर्व स्तरावरील शंभर टक्के कायमस्वरूपी पदभरती करून अतिरिक्त बेडसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी. कोरोना काळामध्ये परिचारिकांच्या रजा स्थगित केल्यामुळे अर्जित रजा ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत असल्याने त्या पुन्हा घेण्याची परवानगी द्यावी. केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांच्या पदनामात बदल करण्यात यावा, परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करण्यात यावी. राज्यातील परिचारिकांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता विनाविलंब देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
मंगळवारीही सकाळच्या सत्रात दोन तास कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास २३ व २४ जून रोजी पूर्णवेळ कामबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर २५ जूनपासून बेमुदत संप करणार असल्याचे परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा तोटे यांनी सांगितले.