दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
By आशपाक पठाण | Updated: October 1, 2022 20:42 IST2022-10-01T20:42:53+5:302022-10-01T20:42:53+5:30
दोघे जखमी : औराद शहाजानी येथील घटना

दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या पुलावर शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.
लातूर ते जहिराबाद महामार्गावरील औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या पुलावर माेटारसायकल क्र. एमएच २४ आ ४७१९ व एमएच १४ ईटी ६७५८ या दोन्ही मोटारसायकलची समाेरा समाेर जाेरदार धडक बसली. यावेळी गाडीवरील चौघेही उडून दूरवर फेकले गेले. यावेळी सूर्यकांत हणमंत खांडेकर (६५), अशोक गुणवंतराव काेळेकर पाटील (५२ रा.केसरजवळगा) दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी असून एक किरकोळ जखमी आहे. जखमींना औराद पोलिसांनी तात्काळ हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. भालकी तालुक्यातील सोमपूर येथील सतीश तानाजी बिरादार (२९) व मुकेश छत्रुग्न बिरादार हे दोघेजण दुचाकीवर तुळजापूरला देवी दर्शनासाठी जात होते. या अपघातात दोघेही जखमी झाल असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे औराद पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे यांनी सांगितले.