दोन दिवसांचे स्त्री जातीचे मयत अर्भक सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:33 IST2018-09-22T12:34:09+5:302018-09-22T15:33:13+5:30
माळकोंडजी गावात झुडुपांमध्ये शुक्रवारी रात्री दोन दिवसीय स्त्री जातीचे मयत अर्भक सापडले.

दोन दिवसांचे स्त्री जातीचे मयत अर्भक सापडले
किल्लारी (जि़ लातूर) : औसा तालुक्यातील माळकोंडजी गावात झुडुपांमध्ये शुक्रवारी रात्री दोन दिवसीय स्त्री जातीचे मयत अर्भक सापडले.यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
माळकोंडजी येथील झुडुपांमध्ये स्त्री जातीचे अर्भक असल्याची माहिती पोलीस पाटील भास्कर क्षीरसागर यांनी शुक्रवारी रात्री ८ वा़ च्या सुमारास किल्लारी पोलिसांना दिली़ त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सपोनि संदीप कामत, गणेश कदम, गणेश यादव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले़ तेव्हा एका झुडुपामध्ये हे अर्भक असल्याचे दिसून आले़ पोलिसांनी पंचनामा केला़ रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले़ याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़