शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 19:39 IST

मोबाईल शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांना दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले.

लातूर : दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघाजणांना गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. संबधित आरोपींकडून ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी सांगितले, १६ जुन रोजी गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते. १७ जुन रोजी तपास पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की, दोन मुले गांधी चौक मार्केट मधील मोबाईल दुरुस्तीच्या दुकानांमध्ये त्यांच्याकडील मोबाईलला सॉफ्टवेअर मारून मोबाईलचा लॉक तोडण्यासाठी विचारपूस करीत फिरत आहे. दरम्यान, माहितीची शहनिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पथक गांधी चौक मार्केट येथे पोहोचले. त्यांना तेथे दोन मुले संशयितरित्या वावरताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आजिम कासिम सय्यद, २५ वर्ष, रा. शास्त्रीनगर लातूर, सध्या रा. सावेवाडी, तर दुस-याने कृष्णा दिगंबर भोसले, वय २२ वर्ष, रा.गोविंद नगर, कळंब रेल्वे गेट जवळ असे सांगितले.

त्यांची अंगझडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे आठ मोबाईल आढळून आले. मोबाईल फोन बाबत विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांना दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२२ कलम ३९२ भादविमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचे ८ मोबाईल असा एकूण १ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेमकुमार माकुडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार दामोदर मुळे, युसुफ शेख, रणवीर देशमुख, शिवाजी पाटील, दत्ता शिंदे, रणजित शिंदे, गोविंद मुळे, श्रीमंत आरदवाड, अर्जुन डिगोळे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर