शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:00 IST

'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी'चे २८ उमेदवार रिंगणात राहणार आहेत

लातूर : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात मोठी खदखद कायम आहे. उमेदवारी वाटपात डावलल्या गेल्याचा आरोप करत पक्षातील जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. नितीन शेटे यांच्या नेतृत्वाखाली 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन करण्यात आली असून, या आघाडीचे २८ उमेदवार रिंगणात राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजपमधील काही नाराजांनी माघार घेण्यास नकार दिला. माध्यमांशी बोलताना नितीन शेटे यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर बोचरी टीका केली. स्थानिक नेतृत्वाने तीन मोठ्या चुका केल्या असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, 'निष्ठावंतांची' ताकद मैदानात किती दिसते आणि भाजप आपली ही गळती रोखण्यात यशस्वी होतो का, याकडे संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक नेतृत्वाच्या या तीन चुका; शेटे यांचा आरोप..!

युती न करणे: शिंदेसेना आणि राष्ट्रवादी(अजित पवार) यांच्यासोबत अधिकृत युती न करून मित्रपक्षांना दुखावले.

बाहेरच्यांना संधी : वर्षानुवर्षे पक्षासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या निष्ठावंतांना डावलून 'आयाराम-गयारामांना' उमेदवारीची खिरापत वाटली.

कार्यकर्त्यांची उपेक्षा : जुन्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा विचार न करता नवीन चेहऱ्यांवर अवाजवी विश्वास टाकला.

आमची लढाई तत्त्वांसाठी"स्थानिक भाजप नेतृत्वाने केलेल्या चुका सुधारण्यासाठी आम्ही ही आघाडी उभी केली आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले, त्यांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली गेली. आता आमची लढाई ही तत्त्वांसाठी आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांशी आमची बोलणी सुरू असून, आम्ही एकमेकांना पूरक मदत करून ही निवडणूक लढवू."- नितीन शेटे, निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी.

महायुतीच्या समीकरणात नवा ट्विस्ट !जिथे शिंदेसेनेचे उमेदवार नाहीत, तिथे 'निष्ठावंत आघाडी'ला सहकार्य मिळेल आणि जिथे आघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे शिंदेसेना व राष्ट्रवादीला मदत केली जाईल, असे निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीचे समीकरण आहे. या नवीन समीकरणामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता शनिवारी (३ जानेवारी) उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटेल.

महत्त्वाचे मुद्दे :२८ उमेदवार : निष्ठावंत आघाडीने शहराच्या विविध प्रभागांत आपले उमेदवार कायम ठेवले आहेत.महायुतीतील मित्रपक्षांशी समझोता : अधिकृत भाजपला शह देण्यासाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत उघड युतीचे संकेत.बंडखोरीचे सावट : भाजपच्या हक्काच्या मतांमध्ये ही आघाडी फूट पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion in Latur BJP! 'Loyal Activist Front' formed, allies with Shinde Sena.

Web Summary : Latur BJP faces rebellion as disgruntled members form 'Loyal Activist Front' with 28 candidates. They're joining hands with Shinde Sena and NCP (Ajit Pawar) against official BJP due to perceived injustices in candidate selection, creating a twist in local elections.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६