२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:20+5:302020-12-12T04:36:20+5:30
... खुंटेफळमध्ये निराधारांना ब्लँकेट वाटप मुरुड : लातूर तालुक्यातील खुंटेफळ येथील नवनाथ शिंदे यांनी गावातील निराधारांना ब्लँकेटचे वाटप करुन ...

२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल
...
खुंटेफळमध्ये निराधारांना ब्लँकेट वाटप
मुरुड : लातूर तालुक्यातील खुंटेफळ येथील नवनाथ शिंदे यांनी गावातील निराधारांना ब्लँकेटचे वाटप करुन मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. यावेळी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, संतोष पवार, धर्मराज पाटील, श्रीमंत शिंदे, अनंत निकते, गणेश शिंदे, बबलू हराळे, सौदागर भिसे, कैलास लोखंडे आदी उपस्थित होते. सध्या हिवाळा असून थंडी वाढली आहे. त्यामुळे निराधारांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे नवनाथ शिंदे यांनी सांगितले.
...
हरभऱ्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
किल्लारी : वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. सध्या रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या हरभऱ्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.