कव्हा ग्रामपंचायत, निसर्ग प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:52+5:302021-07-30T04:20:52+5:30
ग्राहक पंचायतीतर्फे भोसरेकर यांचा सत्कार लातूर : विद्युत तक्रार ग्राहक मंचच्या पुणे झोन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक ...

कव्हा ग्रामपंचायत, निसर्ग प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
ग्राहक पंचायतीतर्फे भोसरेकर यांचा सत्कार
लातूर : विद्युत तक्रार ग्राहक मंचच्या पुणे झोन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने अजय भोसरेकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांची सोडवणूक करणे तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताला प्रतिदिवशी ६०० रुपयांपासून १ लाख रुपये दंड करण्याचे अधिकार या पदावरील व्यक्तीला असतात. ग्राहक मंचचे अध्यक्ष म्हणून दोनवेळा त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे, उपाध्यक्ष डॉ. संतोष जमदाडे, शहराध्यक्ष इस्माईल शेख, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा स्वामी, सुजाता धर्माधिकारी, सरिता संदीकर, मुन्ना हाश्मी, अहेमद हरणमारे, गोविंद राठोड, शारदा बेद्रे उपस्थित होत्या.
लातूर अर्बन बँकेतर्फे पूरग्रस्तांना मदत
लातूर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरासह तालुक्यात पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, लातूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार लातूर जिल्हा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी व संचालक मंडळाने अन्नधान्याची १५० किट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली आहेत. या किटमध्ये गहू पीठ, तांदूळ, खाद्यतेल, तूरडाळ, मिरची पावडर, साबण, जिरे, मोहरी, चहा पावडर, मीठ आदी साहित्याचा समावेश असून, हे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी बँकेचे संचालक भीमाशंकर देवणीकर, रामबिलास लोया, सरव्यवस्थापक सत्यनारायण खटोड, दत्ता जाधव, गोपाळ जोशी, अक्षय बाहेती आदी उपस्थित होते.
प्रा. उदय खामकर पुरस्काराने सन्मानित
लातूर : औसा तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा. उदय खामकर यांना जागतिक स्तरावरील ‘बेस्ट टिचर अर्वार्ड’ने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, बसवराज धाराशिवे, महादेव खिचडे, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, गोपाळ दंडिमे, प्रा. प्रवीण साबदे, योगेश माशाळकर, प्रा. रेवणसिध्द बुक्का, प्रा. मंगेश बिडवे, प्रा. संदेश माडे, प्रा. सुप्रियो सरकार, प्रा. अंकुश बिडवे, प्रा. सतीश अंबुलगे आदींनी खामकर यांचे अभिनंदन केले आहे.
आलगुले यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार
लातूर : येथील जयक्रांती कला आणि वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. केशव आलगुले यांना स्वारातीम विद्यापीठातर्फे जिल्ह्यातील ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार’ २०१९-२० वर्षासाठी जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. गोविंदराव घार, प्राचार्य प्रशांत घार, प्राचार्य डॉ. पी. एन. सगर, डॉ. राजेश्वर खाकरे, डॉ. कुणाल बडदे, डॉ. रामेश्वर स्वामी, डॉ. अविनाश पवार, प्रा. प्रवीण अनभुले, प्रा. शरण निलंगेकर, प्रा. सुवर्णा शिंदे, सय्यद इब्राहिम आदींसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी आलगुले यांचे अभिनंदन केेले आहे.