रेणापूरच्या श्रीराम विद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:57+5:302021-06-16T04:27:57+5:30
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड होते. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. पंडितराव उगिले, सहसचिव विठ्ठलराव कटके, प्राचार्य बी.बी. ...

रेणापूरच्या श्रीराम विद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड होते. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. पंडितराव उगिले, सहसचिव विठ्ठलराव कटके, प्राचार्य बी.बी. कोल्हे, प्राथ. विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक सतीश गोडभरले, रमेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिवशंकर चापुले यांचा पर्यावरण संवर्धन व जैवविविधतेत योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी दुर्मिळ वनस्पतींची लागवड करण्यात आली. तसेच शाळेचे कर्मचारी पुष्पा निकम व जगन्नाथ येमले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले. आभार पुष्पा निकम यांनी मानले.
===Photopath===
150621\img-20210615-wa0051.jpg
===Caption===
श्रीराम विद्यालय रेणापूर येथील शाळेच्या पहिल्या दिवशी श्रीराम विद्यालय मध्ये वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष देविदास कुटवाड सचिव पंडित उगिले सहसचिव विठ्ठल कटके मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी