कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:17+5:302021-06-03T04:15:17+5:30
... सपोउपनि सीताराम घारुळे यांचा सत्कार जळकोट : येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सीताराम घारुळे हे सेवानिवृत्त झाल्याने ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण
...
सपोउपनि सीताराम घारुळे यांचा सत्कार
जळकोट : येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सीताराम घारुळे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पोलीस ठाण्याच्या वतीने सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलीस उपनिरीक्षक बी.व्ही. बोईनवाड, पोलीस जमादार प्रकाश चिमनदरे, गणेश माळवदे, पोलीस कर्मचारी राहुल वडारे, फिरोज शेख, राजश्री हेंगणे, गोविंद पवार, रमेश मिटकरी, अरुण डांगे, देशमुख आदींची उपस्थिती होती.
...
विराळ येथे कोविड लसीकरण मोहीम
जळकोट : तालुक्यातील विराळ येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात आली. या मोहिमेसाठी सरपंच संतोष पवार, सोसायटीचे चेअरमन बळीराम सोनटक्के यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी समुदाय अधिकारी जावेद पठाण, डॉ. व्ही.एस. जाधव, आरोग्य सेवक, अलकनंदा बोटवे, आशा स्वयंसेविका शोभा वाघमारे, मंदाकिनी कोटंबे आदींची उपस्थिती होती.
...
रामलिंग मुदगड येथे जयंतीनिमित्त अभिवादन
निलंगा : तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सोमलिंग कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी, विलास वाडीकर, नरसिंग पुजारी, आकाश काळे, संजय दुधभाते, सचिन दुधभाते, संदीप तरमुडे, दत्तात्रेय दुधभाते, ज्ञानेश्वर जोगी, बिरु तरमुडे, अजय गोरे, व्यंकट शिंगे, संजय तरमुडे, शिवकुमार बेळंबे आदी उपस्थित होते.
...
कासारशिरसी येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार
निलंगा : तालुक्यातील कासारशिरसी येथे कोविड योद्ध्यांचा भाजपाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव झाला. याप्रसंगी कासारशिरशी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, मंडळ सरचिटणीस धनराज होळकुंदे, जिलानी बागवान, भाजयुमोचे परमेश्वर बिराजदार, किरण किवडे, कल्पना ढविले, धोंडिराम बिराजदार, लाला शेख, सरपंच मल्लिकार्जून दानाई, नितीन पाटील आदी उपस्थित होते.