शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लातूरातील सिग्नल बनले शोभेच्या वस्तू! १८ पैकी आठचा तर वापरच नाही, उरलेले पडतात बंद

By हणमंत गायकवाड | Updated: May 29, 2024 11:31 IST

विशेष म्हणजे चालू असणारे सिग्नल अधूनमधून बंद असतात.

लातूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी. चौकांमधील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या अंतर्गत १८ ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत; मात्र यातील आठ सिग्नलचा वापरच नाही. त्यामुळे या निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. विशेष म्हणजे चालू असणारे सिग्नल अधूनमधून बंद असतात. वाहतूक शाखेच्या मनावर ते कधी चालू, तर कधी बंद राहतात. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते. अनेकदा सिग्नल बंद असल्याचे समजून वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन यामुळे होते आहे.

महानगरपालिकेकडे सिग्नलची देखभाल-दुरुस्ती आहे. त्यानुसार लातूर शहरात १८ ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू असतात. या वेळेत वाहतूक शाखेचे पोलिस चौकात असतात; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून वापरात नसलेले सिग्नल बंद आहेत. त्यात विवेकानंद चौक, शाहू चौक, सुभाष चौक, नंदी स्टॉप, खर्डेकर स्टॉप, आदर्श कॉलनी येथील सिग्नलचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातीलही व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून सिग्नल बंद करण्यात आले आहे. नेहमीच सिग्नल बंद असते म्हणून अनेकदा वाहनधारक सिग्नल चालू असताना आणि सिग्नल पडल्यानंतर नियमाचे उल्लंघन करतात. याला कारण म्हणजे वारंवार सिग्नल बंद असणे हे आहे.

वापरातील सिग्नल अनेकदा राहतात बंद... शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे गूळ मार्केट, गांधी चौक, मिनी मार्केट, अशोक हॉटेल, दयानंद गेट या ठिकाणचे सिग्नल अनेकदा बंद असतात. सोमवारी प्रस्तुत ठिकाणचे सिग्नल दिवसभर बंद होते. संविधान चौकातील सिग्नल बराच काळ बंद होते. याबाबत महानगरपालिकेशी संपर्क साधला असता त्यांनी वापरात नसलेले ८ सिग्नल बंद आहेत. उर्वरित दहा सिग्नल सुरू असल्याचे सांगण्यात आले. देखभाल-दुरुस्ती मनपाकडे असून हाताळण्याची जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांकडे आहे.

वापर नसल्यामुळे काही सिग्नल आहेत बंददुरुस्तीसाठी महानगरपालिकेने कंत्राट दिले होते. ते कंत्राट संपल्यामुळे काही सिग्नलची दुरुस्ती राहिली आहे. शिवाय, वापर नसल्यामुळे आठ सिग्नल बंद आहेत. उर्वरित सगळे चालू आहेत. त्यामुळे वाहतुकीला काही अडथळा नाही. सिग्नल व्यवस्था व्यवस्थित आहे. ही व्यवस्था पोलिस वाहतूक शाखेकडून हाताळली जाते.    - गणेश कदम, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडीlaturलातूरMuncipal Corporationनगर पालिका