लातूर : लातुरात बंद घर फाेडले; तीन लाखांचा ऐवज लंपास

By राजकुमार जोंधळे | Updated: April 9, 2023 19:26 IST2023-04-09T19:25:33+5:302023-04-09T19:26:29+5:30

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tore down a closed house in Latur; Lumpas instead of three lakhs |  लातूर : लातुरात बंद घर फाेडले; तीन लाखांचा ऐवज लंपास

 लातूर : लातुरात बंद घर फाेडले; तीन लाखांचा ऐवज लंपास

 लातूर : बंद घर फाेडून जवळपास २ लाख ५० हजारांची राेकड आणि ५५ हजारांचे साेन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना लातुरात राजे शिवाजीनगर, पाखरसांगवी येथे ३ एप्रिल राेजी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी राहुल विजयकुमार ननुरे (वय २७, रा. काेंड जागजी, जि. धाराशिव) हे सध्या पाखरसांगवी परिसरात वास्तव्याला आहेत. ते राहत्या घराला कुलूप लावून गेले हाेते. दरम्यान, चाेरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप, काेंडी ताेडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले राेख २ लाख ५० हजार रुपये, पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी चाेरून नेला. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Tore down a closed house in Latur; Lumpas instead of three lakhs