किल्लारी परिसरात काळीपिवळी मालकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:42+5:302021-03-31T04:19:42+5:30
जिल्ह्यात आता पुन्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी आणि काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केले आहेत. यातून पुन्हा काळीपिवळी चालक, मालकांवर ...

किल्लारी परिसरात काळीपिवळी मालकांवर उपासमारीची वेळ
जिल्ह्यात आता पुन्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी आणि काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केले आहेत. यातून पुन्हा काळीपिवळी चालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काळीपिवळीधारकांसमाेर पुन्हा कर्जाचा डाेंगर उभा ठाकला आहे. विविध बॅक, फायनान्सचे कर्ज, खाजगी देणे, दुकानदाराचे देणे कसे फेडावे असे प्रश्न आता सातावत आहेत. शासनाने ९ आणि १ प्रवाशाचा परवाना दिलेला आहे. प्रत्येक वर्षाला वाहनाचे फिटणेस, रोडटँक्स, इन्सुरन्स, पर्यावरण, व्यवसाय कर आदी ४० हजारांचा खर्च आहे. गतवर्षी तोही खर्च निघाला नाही. वाहन घरासमोर धूळखात उभे हाेते. यंदा सुरळीत सुरु हाेइल, खाजगी सावकाराचे कर्ज घेऊन ४० हजार खर्च करुन, वाहने पासिंग करण्यात आली आहेत. मात्र, जिल्हाधीकारी यांनी काळीपिवळीला ५ आणि १ प्रवासी क्षमतेची अट घातल्याने पुन्हा वाहने बंद करण्याची वेळ आली आहे.
इंधनाचा खर्चही निघत नाही...
येण्या-जाणेसाठी ७५० रुपये लागतात. पाच प्रवासाच्या हिशोबाने येणे-जाणे १० प्रवाशांचे ६० रुपये तिकीटाप्रमाणे ६०० रुपये होतात. अर्थात १५० रुपये घाटा त्यामध्ये चालकांच वेतन, वाहनांची देखभाल असा खर्च आहे. सध्याला हा व्यवसाय ताेट्यात आला आहे. एक प्रवासीवहातूक कमी झालेली आहे. त्यात वहातूक करताना दोन तीन जरी प्रवासी वाढले तर आरटीओ, पोलीस कारवाइ करतात. अशा स्थितीत व्यवसाय करणे माेठे कठीण बनले आहे. असे बालाजी चव्हाण, जनार्धन डुमणे, बालाजी आडे, वाहेदभाई, शेखर कांबळे, मनोज राजपूत, सुमीरसींग ठाकूर, बबलू गायकवाड, राम पाटील, शिवाजी सेलूकर, महादेव माने यांनी सांगितले.