धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिन्यांची कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:20+5:302021-05-09T04:20:20+5:30

चाकूर येथील तानाजी धोंडगे यांनी त्यांच्या घरगुती अडचणीसाठी शिवकुमार सोनटक्के यांच्याकडून पंचासमक्ष १ लाख ५० हजार रुपये घेतले होते. ...

Three months imprisonment for cheating by giving checks | धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिन्यांची कैद

धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिन्यांची कैद

Next

चाकूर येथील तानाजी धोंडगे यांनी त्यांच्या घरगुती अडचणीसाठी शिवकुमार सोनटक्के यांच्याकडून पंचासमक्ष १ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यापोटी त्यांना २५ ऑक्टोबर, २०१३ रोजी धनादेश दिला होता. हा धनादेश फिर्यादी सोनटक्के यांनी बँक खात्यावर वटविण्यासाठी लावला असता, आरोपी धोंडगे यांनी त्यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम न ठेवता खाते बंद केले. त्यानंतर, फिर्यादीने आरोपीस दीड लाख रुपयांच्या मागणीसाठी वकिलामार्फत नोटीस पाठविली, परंतु आरोपीने फिर्यादीचे धनादेशावरील पैसे दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादीने आरोपी विरोधात चाकूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जेष्ठ विधिज्ञ ॲड.एम.जी. जवादे यांच्यामार्फत २७ जानेवारी, २०१४ रोजी खटला दाखल केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या साक्षी, पुरावे, युक्तिवाद ग्राह्य धरून ५ मे रोजी आरोपी तानाजी धोंडगे यास खोटा धनादेश देऊन फसवणूक केली, म्हणून तीन महिन्यांची साधी कैद व धनादेशावरील दीड लाख रुपये परत करणे आणि नुकसान भरपाई व दंड म्हणून दीड लाख असे एकूण तीन लाख रुपये फिर्यादी सोनटक्के यांना आरोपी धोंडगे यांनी देण्याबाबतचा आदेश निकालपत्रात दिला आहे.

Web Title: Three months imprisonment for cheating by giving checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.