निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली

By राजकुमार जोंधळे | Published: August 18, 2023 06:02 PM2023-08-18T18:02:02+5:302023-08-18T18:02:26+5:30

लातूर जिल्ह्यातील कोष्टगाव येथील घटना

Thieves stole the donation box from Sri Nilkantheshwar temple | निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली

निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली

googlenewsNext

लातूर : श्री निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटीच चोरट्यानी पळविल्याची घटना लातूर जिल्ह्यातील कोष्टगाव (ता. रेणापूर) येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील कोष्टगाव येथील श्री निलकंठेश्वर मंदिरातील सभामंडपात असलेली स्टीलची दानपेटी अज्ञात चोरट्यानी उचलून नेली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. मंदीरातील दानपेटी गायब झाल्याची माहिती सकाळी समोर आली. त्यामुळे गावातील नागरिकांनी एकत्रित येत, याबाबतची माहिती त्यांनी किनगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवाय, स्थळपंचनामा केला आहे. 

याबाबत जयंत गणपतराव कुलकर्णी (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुरुडकर करत आहेत.
 

 

Web Title: Thieves stole the donation box from Sri Nilkantheshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.