या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:43+5:302021-08-22T04:23:43+5:30
एसटीचा कसरतीचा प्रवास... ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. माेडकळीस आलेल्या बसेसमधून प्रवास करताना माेठी कसरत ...

या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर..
एसटीचा कसरतीचा प्रवास...
ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. माेडकळीस आलेल्या बसेसमधून प्रवास करताना माेठी कसरत करावी लागत आहे.
- राम जाधव, उदगीर
लालपरीचे ग्रामीण भागातील प्रवाशांना आजही आकर्षण आहे. याच लालपरीचा ग्रामीण प्रवाशांना माेठा आधार आहे. मात्र, माेडकळीला आलेल्या, गळणाऱ्या बसेसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
- साहेबराव किनीकर, लातूर
गाड्यांचा मेंटनन्स वाढला, पण पैसा नाही...
काेराेना काळात गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश बसेस जाग्यावरच थांबून आहेत. अशावेळी बसेसचा मेंटनन्सचा खर्च वाढला आहे. अनेक भंगारातील बसेस दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा निधी नाही.
त्यातच डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. इंधनाचे दर वाढल्याने माेठी कसरत करून लातूर विभागाला प्रवासी सेवा द्यावी लागत आहे. मध्यंतरी डिझेलअभावी दाेन आगारातील प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागली हाेती.
नादुरुस्त बसेस, गळणाऱ्या बसेस आणि आसनव्यवस्था दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आर्थिक घडी अद्यापही बसलेली नाही. अशा स्थितीत आवश्यक बाबींवरच निधी खर्च केला जात आहे.