मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:46+5:302021-06-16T04:27:46+5:30

शहरातील ईदगाह मैदान संरक्षण भिंतीचे बांधकाम व सुशोभीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे होत्या. यावेळी शिवानंद ...

There will be no shortage of funds for constituency development | मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

शहरातील ईदगाह मैदान संरक्षण भिंतीचे बांधकाम व सुशोभीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे होत्या. यावेळी शिवानंद हेंगणे, सांबप्पा महाजन, जि. प.चे गटनेते मंचकराव पाटील, जि. प. सदस्य माधव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, मीनाक्षी शिंगडे, शिवाजीराव देशमुख, ॲड. हेमंत पाटील, शिराजोद्दीन जहागीरदार, अभय मिरकले, मौलाना युसूफ (नाजीम साब), मुफ्ती फाजील साब, हाफीज खुर्शीद साब, मौलाना फजले करीम साब, सलीम सय्यद, अमीरसाब, जहुरोद्दीन काजी, मोहसीन बायजीद, मुजीब पटेल, काजी रियाजोद्दीन सिद्दिकी, आजीज काझी, अन्वर पटेल, अजहर बागवान, करीम गुळवे, निवृत्ती कांबळे, शिवाजी खांडेकर, अभियंता प्रकाश मोरे, मुुुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, इलियास सय्यद यांची उपस्थिती होती.

यावेळी लक्ष्मीकांत कासनाळे, प्रशांत भोसले, दयानंद पाटील, बालासाहेब पाटील, शेखर चौधरी, ॲड. भारतभूषण क्षीरसागर, विलास पवार, उत्तम माने, तानाजी राजे, जावेद बागवान, डॉ. फुजैल जहागीरदार, ताजोद्दीन सय्यद, रवी महाजन, फेरोज शेख, अय्याज शेख, फेरोज सय्यद, जमील मौलासाब, बाबूभाई रुईकर, भैयाभाई सरवरलाल, सुभाष मुंडे, दिलदार शेख, पापा अय्या, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, इमरोज पटवेगर, हुसेन मणियार, एजाज शेख, अनिस कुरेशी, वसंत शेटकार, सतीश नवटक्के, बालाजी आगलावे, सचिन पडिले, राहुल शिवपुजे, सुनील डावरे, प्रकाश ससाणे यांची उपस्थिती होती.

यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतशिवार सिंचनाखाली आणण्यासाठी मन्याड नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहराबरोबर ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. शासकीय निधीतून होणारी कामे दर्जेदार व वेळेत करावीत, अशा सूचनाही त्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना केल्या.

Web Title: There will be no shortage of funds for constituency development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.