पाचवी ते आठवीचे वर्ग होणार सुुरू, पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:35+5:302021-01-17T04:17:35+5:30
नववी ते बारावीची ४८ टक्के उपस्थिती... गेल्या दीड महिन्यांपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या ४८ ...

पाचवी ते आठवीचे वर्ग होणार सुुरू, पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
नववी ते बारावीची ४८ टक्के उपस्थिती...
गेल्या दीड महिन्यांपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शाळास्तरावर तपासणी करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर माध्यमिक शाळांतील उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे.
पालकांच्या प्रतिक्रिया...
शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यास नियमित वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. - रामरेड्डी बंदे, पालक
शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सुलभ जाईल. त्यामुुळे पाल्यास शाळेत पाठविणार आहे. ऑनलाइनच्या तुलनेत प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यामुळे आनंद आहे. - अमोल पंडगे, पालक
कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. आता नियमांचे पालन करीत शाळा सुरू होत आहेत. मुलांना शाळेत जाण्याची उत्सुकता असून, मास्क, सॅनिटायझर सोबत देऊनच पाल्यास शाळेत पाठविणार आहे. उस्मान पठाण, पालक