गावात स्मशानभूमी नसल्याने मयतावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:50+5:302020-12-04T04:58:50+5:30
अंबुलगा मेन येथील खंडू दगडू कांबळे (३२) याचा बुधवारी रात्री अल्पश: आजाराने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी झाली. ...

गावात स्मशानभूमी नसल्याने मयतावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
अंबुलगा मेन येथील खंडू दगडू कांबळे (३२) याचा बुधवारी रात्री अल्पश: आजाराने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी झाली. परंपरागतच्या गावातील ओढ्यालगतच्या जागी अंत्यविधी करण्याची तयारी सुरु असताना ओढ्याला पाणी असल्याने आता अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, गावातील पोलीस पाटील राम पाटील यांनी आपल्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत खंडू कांबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
दहा वर्षांपासून गावामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न आहे. मृतदेह घरीच ठेवून नातेवाईकांनी तहसील कार्यालय गाठून निवेदनाद्वारे स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवावा, अशी मागणी केली. यावेळी पानचिंचोलीचे पोलीस जमादार सुनील पाटील, किशोर सूर्यवंशी, माधव कांबळे, मंडळ अधिकारी धुमाळ, ग्रामसेवक तलाठी आदींसह नातेवाईकांची उपस्थिती होती.
प्रश्न त्वरित मार्गी लावू...
गावात स्मशानभूमी नसल्याने निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात तहसील प्रशासनाला कळवून त्वरित प्रश्न मार्गी लावू.- ए.एन. बिराजदार, प्रशासकीय अधिकारी.