नेत्रदानाबद्दल समाजात जनजागृती गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:37+5:302021-08-26T04:22:37+5:30
येथील उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डाॅ. अर्चना पवार, डाॅ. सुप्रिया ...

नेत्रदानाबद्दल समाजात जनजागृती गरजेची
येथील उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डाॅ. अर्चना पवार, डाॅ. सुप्रिया पाटील, डाॅ. स्वप्नील शिंदे, डाॅ. योगिता खुरे, अभिजित औटे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. बसपुरे म्हणाले, नेत्रदानावेळी मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे, तेथील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून डोळ्यांवर ओला कापूस अथवा ओला रूमाल ठेवावा. डोक्याखाली जाड उशी ठेवावी. डॉक्टरकडून मृत्यूचा दाखला तयार ठेवावा. डोळ्यांतील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासांच्या आत काढावे लागतात. त्यामुळे जवळील नेत्रपेढीस तत्काळ कळवावे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते.
यावेळी हजारे, प्रशांत गायकवाड, गणेश जोगदंड, जावेद शेख, सुरेश तिवारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी एस.एस. पाटील यांनी केले. आभार प्रशांत गायकवाड यांनी मानले.