... तर जिल्ह्यातील ८५५ गावांत सुरू होऊ शकतात शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:42+5:302021-06-29T04:14:42+5:30
लातूर : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे. १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन सुरू ...

... तर जिल्ह्यातील ८५५ गावांत सुरू होऊ शकतात शाळा
लातूर : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे. १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. जिल्ह्यात एकूण गावांची संख्या ९२८ आहे. त्यापैकी ८५५ गावे कोरोनामुक्त झाली असून, केवळ ७३ गावांमध्ये कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे ८५५ गावांमधील शाळा सुरू करता येऊ शकतात. मात्र त्याबाबत शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे शाळाही बंद आहेत. परिणामी, ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. मात्र यावर्षी अध्यापनाऐवजी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. जी गावे कोरोनामुक्त आहेत, त्या गावांत शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही. यामध्ये ग्रामपंचायत, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
जिल्ह्यातील एकूण गावे ९२८
कोरोना रुग्ण नसलेली गावे ८५५
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
अहमदपूर ११६
औसा १२८
चाकूर ७८
देवणी ५२
जळकोट ४७
रेणापूर ७७
निलंगा १३८
शिरूर अनंतपाळ ४७
लातूर १००
उदगीर ९२
शासन निर्णयाची प्रतीक्षा
शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील. त्यानंतर जिल्हास्तरावर याबाबत आढावा घेतला जाईल. त्यानंतरच कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी