चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:31+5:302021-05-26T04:20:31+5:30
घरासमोर दुचाकी पार्किंग केल्याच्या कारणावरून मारहाण लातूर : घरासमाेर दुचाकी पार्किंग करण्याच्या कारणावरून महेबूबनगर येथे मारहाण झाल्याची घटना २३ ...

चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी
घरासमोर दुचाकी पार्किंग केल्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : घरासमाेर दुचाकी पार्किंग करण्याच्या कारणावरून महेबूबनगर येथे मारहाण झाल्याची घटना २३ मे रोजी घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित चोरांनी संगनमत करून फिर्यादी गुलाम रसूल राजेखॉ यांच्या घरासमाेर येऊन दुचाकी पार्किंग करण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या मुलास आणि पत्नीस शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तोंडावर बुक्कीचा ठोसा मारून फिर्यादीचा दात पाडून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. असे गुलाम रसुल राजेखाॅ, रा. मेहबूबनगर, खाेरे गल्ली लातूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनियार ईलाही शेख व अन्य तिघांविरुद्ध (सर्व, रा. मेहबूबनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गिरी करीत आहेत.
शेतातील रस्त्यावरून भांडणाची कुरापत
लातूर : शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून भांडणाची कुरापत काढून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना देवणी तालुक्यातील चवनहिप्परगा येथे घडली. याबाबत राजेंद्र लिंबराज बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी तुळशीराम बिराजदार यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच तू जर आमच्या नादाला लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोना साळुंके करीत आहेत.
नागरसोगा रोडवरून दुचाकीची चोरी
लातूर : घरासमाेर पार्क केलेली दुचाकी (क्र. एमएच १२ एफएच ७५७०) व कारमधील टेपची चोरी झाल्याची घटना २४ मे रोजी नागरसोगा रोड भागात घडली. याबाबत अविनाश रमाकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करीत आहेत.
घर खाली कर म्हणून मारहाण
लातूर : तू राहत असलेले घर आमचे आहे ते खाली कर असे म्हणून लामजना येथे फिर्यादी व मुलास आणि नातेवाइकास जबर मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत किल्लारी पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तू राहत असलेेले घर आमचे आहे, ते खाली कर म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी फिर्यादी सुभाष नरसिंग साबणकर यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या मुलास पाठीत डाव्या खुब्ब्याखाली चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्याला खाली पाडून डाव्या पायावर दगड मारून पाय फ्रक्चर केला. तसेच फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. असे सुभाष साबणकर यांनी किल्लारी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अरुण बाळू साबणकर, रा. लामजना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंडे करीत आहेत.